मुंबई : पुन्हा एकदाआपल्या विनोदामुळे स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आतादेखील मुनव्वरनं केलेल्या एका पोस्टमुळे वादंग उठला आहे. मुनव्वरनं त्याच्या पोस्टमधून जस्टिन बीबर च्या आजारपणाचा संदर्भ देत देशातील सद्य परिस्थितीवर टीका केली. मात्र, ही टीका सोशल मीडियावरील युझर्सना अजिबात आवडली नाही. यावरून त्याला खूप वाईट पद्धतीनं ट्रोल केलं गेलं.

‘मी कपडे फाडेन’ जेव्हा शाहरुखने तिच्यासाठी केलेलं मोठं वक्तव्य

मुनव्वरच्या पोस्टवरून उठला वादंग

अलिकडेच जस्टिन बीबरनं सांगितलं होतं की, त्याला अत्यंत दुर्मिळ असा आजार (Ramsay Hunt Syndrome) झाला आहे. या आजारामुळे त्याचा उजवा चेहरा पॅरालाईज झाला आहे. बीबर याच्या या आजाराचा संदर्भ देत मुनव्वरनं भारतामधील राजकीय परिस्थितीचा संदर्भ दिला आहे. मुनव्वरनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, ‘प्रिय जस्टिन बीबरला पूर्ण कल्पना आहे की भारतामध्येदेखील उजवी बाजू चांगल्या पद्धतीनं काम करत नाही.’

मुनव्वर फारुकी

मुनव्वर फारुकी झाला ट्रोल

मुनव्वरनं पोस्ट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. कारण त्यांचा जुना मुनव्वर परत एकदा फॉर्ममध्ये आला. परंतु सोशल मीडियावरील अनेक युझर्सना मुनव्वरनं केलेली ही मजेशीर पोस्ट अजिबात आवडली नाही. अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. एका युजरनं लिहिलं की, ‘ एखाद्याच्या आजारावर तुला जोक करण्याचा काहीच अधिकार नाही. तू किती निर्दयी आहेस, हे समजलं.’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की, ‘यात थट्टा करण्यासारखं काय आहे. एखाद्याच्या आजारपणाची टिंगल करणं कधीही योग्य नाही.’ मुनव्वर फारूकीचे टीकाकारच नाही तर अनेक चाहत्यांनाही त्याची हो पोस्ट आवडलेली नाही.

कोण आहे सिद्धांत कपूर? ड्रग्ज केसमध्ये कसा अडकला? जाणून घ्या सर्वकाही

जस्टिन बीबरला झालं काय

जस्टिन बीबरनं एक व्हिडिओ पोस्ट करत त्याला झालेल्या आजारपणाची माहिती दिली. या आजारपणामुळे भारतात होणारा कार्यक्रम रद्द करत असल्याचंही सांगितलं. रामसे हंट या व्हायरसमुळे त्याला हा आजार झाला असून त्याच्या उजव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आल्याचं त्याने सांगितलं. इतकं की त्याला डोळ्याच्या पापण्यादेखील हलवता येत नाहीयेत. या आजारामुळे आता त्याला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुसेवाला हत्याप्रकरणात पुण्यातील आरोपीला बेड्या; चौकशीत धक्कादायक खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here