अमरावती: आंध्र प्रदेशात पबजीमुळे एका मुलाचा बळी गेला आहे. पबजी खेळात हरल्यामुळे एका मुलाला त्याच्या भावंडांनी चिडवलं. त्यांच्या चिडवण्याला कंटाळून मुलानं गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आंध्र प्रदेशातील माछिलपाटणम जिल्ह्यात ही घटना घडली.

१६ वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांसोबत उन्हाळी सुट्टीत त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. त्याचे आई-वडील गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहतात. या परिस्थितीत मुलानं वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या मृत्यूमुळे आई चिंतेत आहे. तिनं कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जूनला मुलगा त्याच्या भावांसोबत पबजी खेळत होता. एका राऊंडमध्ये तो पराभूत झाला. त्यामुळे भावंडांनी त्याची खिल्ली उडवली, त्याला चिडवण्यास सुरुवात केली. भाऊ चिडवू लागल्यानं मुलाला वाईट वाटलं. त्यानं घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यावर वडिलांनी तू पबजी खेळू नकोस, असं मुलाला सांगितलं. त्यामुळे मुलगा आणखी तणावाखाली गेला.
बाईकचे पेपर दाखव! निरीक्षकानं पावती फाडली; लाईनमननं पोलीस ठाण्याची वीज कापली
भावंडांनी चिडवल्यामुळे मुलगा उदास होता. रात्री जेवल्यानंतर त्यानं खोलीचा दरवाजा बंद केला. सकाळी त्याच्या वडिलांनी दार ठोठावलं. मात्र आतून कोणताच आवाज आला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यावर कुटुंबीयांनी दार तोडलं. त्यावेळी खोलीत मुलाचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
शेवटी मित्रच आला कामी! रशियाकडून भारताला ‘पॉवरफुल’ हमी; चीन, पाकिस्तानची चिंता वाढली
लखनऊमध्ये पबजीवरून आईचा खून

पबजी खेळत असताना रोखल्यानं मुलानं आईचा खून केल्याची घटना गेल्याच आठवड्यात लखनऊमध्ये घडली. वडिलांच्या रिव्हॉल्वरनं १६ वर्षांच्या मुलानं आईवर गोळी झाडली. यानंतर मुलानं बहिणीला धमकावलं. मित्रांना घरी बोलावून मौजमजा केली. आईच्या मृतदेहाचा दुर्गंध पसरू नये यासाठी त्यानं घरभर रुम फ्रेशेनर स्प्रे केला. तीन दिवसांनंतर दुर्गंधी वाढू लागली. यानंतर मुलानं वडिलांना व्हिडीओ कॉल केला आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. आईची हत्या करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here