मुंबई: हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप नुकताच पत्नी अंबर हर्ड विरुद्ध असलेला मानहानीचा खटला जिंकला. या खटल्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. ‘द रमी डायरी’च्या निमित्तानं भेटलेल्या जॉनी आणि अंबरचा विवाह फक्त १५ महिनेच टिकला. घरगुती हिंसाचाराचे आरोप करत अँबरनं एका वृत्तपत्रात मोठा लेख लिहून आपली व्यथा मांडली होती, यालाच उत्तर म्हणून जॉनीनं हा खटला दाखल केला होता.

हा खटला जिंकल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी जॉनी सध्या अनेक हॉटेलमध्ये दिसतोय. आता हा विजय साजरा करण्यासाठी अभिनेता जॉनी डेप आपल्या मित्रांसह यूके बर्मिंघम येथील वाराणसी या भारतीय हॉटेलमध्ये गेला होता. जॉनी या हॉटेलमध्ये गेल्यापासून त्या हॉटेलची लोकप्रियता वाढली आहे. जॉनीमुळे हे हॉटेल चर्चेत आलं असून सोमवारपासून खवय्यांची तिथे प्रचंड गर्दी होतेय.
शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा, पुष्कर जोगच्या आई विरोधात गुन्हा दाखल
या हॉटेलचे मालक, संचालक मोहम्मद हुसेन यांच्या मित्रानं अनेक वेळा जॉनी डेपच्या टीमला या भारतीय हॉटेलविषयी सांगितलं होतं. हा मित्र जॉनी डेप आणि त्याचा मित्र जेफ यांना वाराणसी हॉटेलमध्ये घेऊन आला होता. रविवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून जॉनी डेप असेपर्यंत हे हॉटेल सामान्य ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं.
‘मी कपडे फाडून रस्त्यावर उभा राहीन’ जेव्हा शाहरुख खानने तिच्यासाठी केलेलं मोठं वक्तव्य
जॉनी डेपनं या रेस्टॉरंटमध्ये बटर चिकन, पनीर टिक्का, लॅम्ब कढई आणि किंग प्रॉन भुना हे पदार्थ मागवले होते. त्याबरोबर नान, भात आणि कोशिंबीरही चाखली. संचालक हुसेन यांच्या म्हणण्यानुसार, जॉनीनं टिप आणि बिल मिळून सुमारे ५० हजार ब्रिटिश युरो म्हणजेच सुमारे ४८ लाख ६२ हजार रुपये खर्च केले. या भारतीय हॉटेलच्या भेटी दरम्यान जॉनीनं वाराणसीच्या प्रत्येक स्टाफसह फोटो काढत त्यांच्याशी गप्पा मारल्या. तो रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here