मुंबई : राज्यसभेवर नुकतेच निवडून गेलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची निवड रद्द करावी, अशी मागणी भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भ्रष्ट पद्धतीने मतं मिळविल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. राऊत यांच्या विजयावर माझा आक्षेप असून त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी नुकतीच निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेकडून पहिल्यांदाच संजय राऊत यांनी राज्यसभेचा विजयी चौकार मारला. मात्र संजय राऊत यांनी भ्रष्ट पद्धतीने मते मिळवून निवडणूक जिंकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या म्हणाले, “आज निवडणूक आयोगाकडे संजय राऊतांविरोधात तक्रार याचिका सूपूर्द केली. राऊतांनी आमदारांना धमक्या देणं, आमदारांनी कुठे मतं दिली आहेत, हे सांगून गुप्ततेचा भंग करणं, निवडणूक आयोगाला बदनाम करणं, प्रश्न असाय की अमुक ६ आमदारांनी आघाडीला मतदान केलं नाही हे संजय राऊतांना कळलं कसं? म्हणजेच मतमोजणीवेळी राऊतांनी आचारसंहितेचा भंग केलाय. म्हणून निवडणूक आयोगाने राऊतांविरोधात कारवाई करावी”

संजय पवारांच्या पराभवानंतर संजय राऊत अडचणीत; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल होणार?
मला विश्वास आहे, निवडणूक आयोग माझ्या तक्रारीचा योग्य विचार करुन संजय राऊत यांच्यावर कारवाई करेल. एका बाजूला फौजदारी प्रक्रिया तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या निवडीची प्रक्रिया रद्द व्हावी. याचसंदर्भात उद्या मी निवडणक आयोगाच्या सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.

राऊतांकडून आचारसंहितेचा भंग, दरेकरांचा दावा

राज्यसभच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांच्या पराभवामुळे शिवसेनेत नाराजी आहे. या पराभवाचे खापर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांवर फोडले. या आमदारांनी पवारांना मतदान न केल्याने त्यांचा पराभव झाला. पवारांना मतदान न करणाऱ्या आमदारांची यादी आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे भाजप नेत्यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. राऊतांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांनी आमदारांचा अपमान केला असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. ते उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here