हैदराबाद: हैदराबादमध्ये १७ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करायचा ते आधीच ठरलेलं होतं. प्रथमदर्शनी पुराव्यांमधून ही बाब समोर आल्याची माहिती हैदराबाद पोलीस दलातील सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.

चार अल्पवयीन आणि एका सज्ञान आरोपीनं मिळून नियोजनबद्ध रितीनं गुन्हा केला. बलात्कार करायचा हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. त्यांच्यासोबत कंडोम होते आणि त्यांनी बलात्कार करताना कंडोमचा वापरदेखील केला, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. आरोपींनी वापरलेले कंडोम नेमके कुठून आणले त्याचा तपास आता पोलीस करत आहेत.

कसल्या धमक्या अन् कसला इशारा; बॅन असतानाही रशियानं भरला खजिना, छप्परफाड कमाई
पबमधून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पबमध्ये जाण्यापूर्वीच कंडोम खरेदी केली होते की पबमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ते विकत घेतले, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींचे कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) गोळा केले आहेत. त्यांच्या चौकशीवेळी या सीडीआरचा वापर करण्यात येईल. गुन्हा घडत असताना आणि त्यानंतर फरार झाल्यानंतर आरोपी कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती शोधण्यासाठी सीडीआर तपशील महत्त्वाचा ठरेल, असं पोलिसांनी सांगितलं.
डिपॉझिट वाचेना, पण हौस फिटेना; १७ वेळा पराभूत होऊनही प्रॉपर्टी ब्रोकर निवडणूक लढवणार
प्रकरणातील सर्वच्या सर्व ६ आरोपींना पोलिसांनी रविवारी ज्युबिली हिल्स रोड नंबर ४४ वर नेलं. याच ठिकाणी सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण क्राईम सीन रिक्रीएट केला. संपूर्ण गुन्हा कसा घडला आणि त्यानंतर आरोपी कुठे गेले, हे समजून घेण्यासाठी क्राईम सीन रिक्रीएट करण्यात आला.

आरोपींनी चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबात काही विसंगती आढळून आल्याची माहिती पोलीस दलातील सुत्रांनी दिली. आरोपींनी दिलेले जबाब पडताळून पाहिले जातील. त्यासाठी सीडीआरची मदत घेतली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात अद्याप पोटेन्सी टेस्ट रिपोर्ट आलेला नाही. हा रिपोर्ट तपासात महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातून बरीचशी शास्त्रीय माहिती हाती लागेल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here