ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज १४ जून रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांकडून आपआपल्या भागात बॅनर्स लावून राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातही असेच शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. मात्र १३ जून रोजी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी हे बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इरफान सय्यद यांच्याकडून मुंब्रा परिसरात बॅनर्स लावण्यात आले होते. मुंब्रा येथील नुरानी हॉटेलसमोरील रस्त्यावर हे बॅनर लावण्यात आले होते. मात्र यातील काही बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या जाहीर सभेत मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला होता. तसंच या मशिदींसमोर हनुमान चालीसा तितक्याच मोठ्या आवाजात लावण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर मुंब्र्यातील वातावरण तापले आणि या परिसरातील मनसे पदधिकारी इरफान सय्यद यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा बॅनर्स फाडण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

विधान परिषदेसाठी असे आहे मतांचे समीकरण; शिवसेना म्हणते, ‘आता तुमचे तुम्ही बघा’

दररम्यान, इरफान सय्यद यांनी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली असून आपण कामानिमित्त बाहेर गेलो असता ही घटना घडली असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणी इरफान सय्यद हे मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे पोलीस बॅनर फाडणाऱ्या व्यक्तींविरोधात नक्की काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here