अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आयुष्यातील दोन अभिनेत्रींची सर्वाधिक चर्चा झाली. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे या दोघींबरोबरचे सुशांतचे नाते कधी लपले नव्हते. पण या व्यतिरिक्त आणखी दोन अभिनेत्रींसह सुशांतचे नाव जोडले गेले
हे वाचा-त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं , सुशांतचे चाहते आजही विसरले नाहीत तो दिवस
रिया चक्रवर्ती
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती हे नाव वारंवार येत होते. याप्रकरणी समोर आलेल्या ड्रग केसमध्येही अभिनेत्रीला अटक करण्यात आली होती. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सुशांत आणि रियाचे रोमँटिक फोटोही समोर आले होते. सुशांच्या कठीण काळात ती त्याच्या सोबत होती असल्याचा दावाही अनेकदा तिने केला होता.
अंकिता लोखंडे

‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. सहा वर्ष हे कपल रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतने अंकिताला एका रिअॅलिटी शोच्या मंचावर प्रपोज देखील केले होते. त्यांचे रिलेशनशिप सुरू असताना सुशांतने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा सुशांतचा सिनेमा २०१६ साली प्रदर्शित झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार याच वर्षी या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
क्रिती सेनॉन
अभिनेत्याचे नाव त्याची ‘राबता’मधील सहकलाकार क्रिती सेनॉन हिच्यासह देखील जोडले गेले होते. या सिनेमाच्या रीलिज दरम्यान त्यांची लव्ह स्टोरीची चर्चा विशेष रंगली होती. मात्र दोघांनी कधी याचा स्विकार नव्हता केला. पण त्यांच्यातील मैत्री चाहत्यांना आवडली होती. ‘राबता’ सिनेमा जरी फ्लॉप ठरला असला तरीही प्रेक्षकांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आवडली होती.
हे वाचा-२४ वर्षांपासून बेपत्ता हा बॉलिवूड अभिनेता, पत्नीने केलं दुसरं लग्न तर मुलगी आहे ज्वेलरी डिझायनर
सारा अली खान
‘केदारनाथ’ च्या शूटिंगदरम्यान सारा अली खान आणि सुशांतसिंह राजपूत यांच्यामध्ये जवळीक वाढल्याचे वृत्त समोर आले होते. साराचा हा पहिला सिनेमा होता. मीडिया रिपोर्टनुसार सुशांत या सिनेमानंतर ‘सोनचिरियाँ’च्या शूटिंगमध्ये व्यग्र झाला होता, तर सारा काही काळ कार्तिक आर्यनला डेट करत होती.