Tukaram Maharaj Shila Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) हे आज (14 जून) देहूत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहूत तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मात्र, हे शिळा मंदिर नेमके कसे आहे? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. तर जाणून घेऊयात या शिळा मंदिराबद्दलची माहिती…

…..म्हणून मंदिराला शिळा मंदिर असं संबोधलं गेलं

जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर  उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता. म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.

शिळा मंदिरातच संत तुकाराम महाराजांची पहिली मूर्ती अन 36 कळस

मंदिरात स्थापित केलेल्या दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर  कळस नव्हता. त्या शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची 42 इंच सुबक मूर्ती आहे. तर मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्यानं शिळा मंदिराची कळसापर्यंतची उंची 42 फुटांची आहे. शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. संत तुकोबांची काळ्या पाषाणातील ही मूर्ती 42 दिवसांमध्ये उभारली आहे. ही मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे, पिंपरी चिंचवड यांनी तयार केली आहे.

शिळा मंदिर कसं आहे

सर्वोदय भारत शिल्पकला कन्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे मंदिर उभारणीचं काम देण्यात आलं होतं. मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे. मूळ गर्भगृह 14×14 एवढ्या आकाराचे आहे. 
अंतर गर्भगृह 9×9 उंची 17×12 एवढी आहे. मंदिराची उंची 42 फूट आहे. यासाठी एकूण खर्च हा 1 कोटी 17 लाख 47 हजार 500 रुपये आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here