Raju Shetty | राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत याबाबत माहिती दिली आहे. धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिलं आहे त्याचा मी कृतज्ञपुर्वक स्वीकार करतो, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

 

Raju Shetty Toyota car
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

हायलाइट्स:

  • सामान्य जनता ही लोकप्रतिधींच्या नावाने कायम बोटं मोडताना, दुषणं देताना दिसते
  • अशा काळात एखाद्या नेत्यावर जनतेने एवढं प्रेम करणं, हा प्रकार विरळाच म्हणावा लागेल
  • राजू शेट्टी हे गेली अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते म्हणून लोकप्रिय आहेत
कोल्हापूर: एखाद्या नेत्यावर जनतेचे मनापासून प्रेम असले की काय होऊ शकते, याचा प्रत्यय सध्या कोल्हापूर जिल्ह्यात येत आहे. एरवीही कोल्हापूर म्हटलं की, ‘जगावेगळा थाट’, ‘रॉयल कारभार’ अशी विशेषणे आपसूकच आपल्या डोळ्यासमोर येतात. याच कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्याबाबत दाखवलेला दिलदारपणा सध्या चर्चेचा विषय आहे. राजू शेट्टी (Raju Shetty) हे गेली अनेक वर्षे कोल्हापूर आणि सांगली परिसरात शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. येथील जनतेमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. याच प्रेमापोटी सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांनी राजू शेट्टी यांना वर्गणी काढून अलिशान कार भेट दिली आहे.
धनंजय महाडिकांनी राजू शेट्टींचे रस्त्यातच पाय धरले!
राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत याबाबत माहिती दिली आहे. धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिलं आहे त्याचा मी कृतज्ञपुर्वक स्वीकार करतो, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. राजू शेट्टी यांना जनतेने वर्गणी काढून छोटीमोठी नव्हे तर थेट टॉयोटाची अलिशान कार भेट दिली आहे. या कारची किंमत साधारण ४० लाख रुपयांच्या घरात आहे. सध्याच्या काळात सामान्य जनता ही लोकप्रतिधींच्या नावाने कायम बोटं मोडताना, दुषणं देताना दिसते. मात्र, अशा काळात एखाद्या नेत्यावर जनतेने एवढं प्रेम करणं, हा प्रकार विरळाच म्हणावा लागेल.

राजू शेट्टी हे गेली अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते म्हणून लोकप्रिय आहेत. जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या राजू शेट्टी यांनी खासदारकीची निवडणूक जिंकण्यापर्यंत मजल मारली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून निवडून आले होते. राजू शेट्टी यांच्याबाबत जनता पहिल्यांदाच इतकी उदार झालेली नाही. यापूर्वीही राजू शेट्टी निवडणुकीसाठी उभे राहिले होते तेव्हा जनतेने लोकवर्गणी काढून त्यांच्या निवडणूक अर्जासाठी लागणार अनामत रक्कम (डिपॉझिट) भरली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जनतेने राजू शेट्टी यांना खास गिफ्ट दिले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : kolhapur and sangli constituency peoples gift toyota car to swabhimani shetkari sanghatana leader raju shetty
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here