aurangabad raj thackeray birthday: राज ठाकरेंच्या वाढदिवसनिमित्त मनसेकडून रिटर्न गिफ्ट; ‘इथं’ मिळतंय निम्म्या दराने पेट्रोल – mns raj thackeray birthday distribution of petrol at half rate in aurangabad district
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त आज अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमिवर औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्त दरामध्ये पेट्रोलचं वाटप होत आहे. एक दिवस का होईना पण स्वस्तात पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांनी पेट्रोल स्थानकात मोठी गर्दी केली आहे.
औरंगाबादमध्ये मनसेच्यावतीने अवघ्या ५४ रुपयांमध्ये पेट्रोल देण्याचा उपक्रम राबण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली असून निम्म्या दराने पेट्रोल मिळत असल्याने वाहनधारकांमध्ये आनंद आहे. पेट्रोल घेण्यासाठी वाहन धारकांनी सकाळी ७ वाजेपासूनच पेट्रोल पंपावर गर्दी केली होती.
घरचे बॉयफ्रेंडवरून ओरडले म्हणून प्यायली फिनाइल, रुग्णालयात गेल्यावर असं काही कळलं की… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने शहरात मनसे पदाधिकऱ्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच निमित्ताने आज सकाळी क्रांतिचौक येथील पेट्रोल पंपावर सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान पेट्रोल ११३ नव्हे तर निम्म्या दरात म्हणजे ५४ रुपये लिटर प्रमाणे देण्यात येईल अशी घोषणा जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केली होती. त्यामुळे आज सकाळपासून पपंवर दुचाकी, रिक्षा चलकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे दोन हजार वाहनांना निम्म्या दरातील पासचे वाटप करण्यात आले. अशी माहिती जिल्हाध्यक्ष खांबेकर यांनी दिली.