ठाण : ठाणे पोलिसांच्या वेबसाइटवर सायबर हल्ला झाला असून ही वेबसाइट अज्ञातांकडून हॅक करण्यात आली आहे. पोलिसांची वेबसाइट हॅक केल्यानंतर त्यावरून हॅकर्सनी सरकारला इशारा दिला आहे. ‘भारत सरकार, तुम्ही वारंवार इस्लामबद्दल अडचणी करून वाद निर्माण करत आहात. तुम्हाला सहनशीलता कळत नाही. जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा नाहीतर आम्ही शांत बसणार नाही,’ अशा आशयाचा मजकूर हॅकर्सने ठाणे पोलिसांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे.

मागील काही वर्षांपासून वेबसाइट हॅक करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या आणि संस्थांच्या वेबसाइट हॅक करण्यात आल्या आहेत. अशातच आता ठाणे पोलिसांचीही वेबसाइट हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. वेबसाइट हॅक झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे.

प्रेषित पैगंबर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी; भारताला मिळाली ‘या’ मुस्लिम देशाची साथ

दरम्यान, ही वेबसाइट कोणी हॅक केली, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नसून सायबर पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

सात हजार दिले नाही म्हणून चक्क बॉम्बच ठेवला दुकानापुढे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here