पिंपरी : पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकापर्ण करण्यात येणार आहे. देहू परिसरात अनेक ठिकाणी भाजपकडून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत.
विठ्ठलाच्या फोटोपेक्षा नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा वापरण्यात आला आहे. यावरून वरपे यांनी आक्षेप घेत हा फोटो लावल्याने वारकरी सांप्रदयाचा अपमान असून या संदर्भात भाजपने वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविकांत वर्पे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे.
मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या बॅनरची चांगली चर्चा रंगू लागली आहे. त्यावर पोलिसांकडून वरपे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.