माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे…मिताली नव्हे तर या अभिनेत्रीची सिद्धार्थसाठी खास पोस्ट – mrunmayee deshpande share special birthday post for best friend siddharth chandekar
मुंबई: अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी सिनेइंडस्ट्रीमधली चर्चेतली जोडी. दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघांचे क्सुट आणि रोमॅंन्टिक फोटोही व्हायरल होतात. गेल्या वर्षी दोघं विवाहबंधनात अडकले. नवरा बायकोच्या या नात्यातला गोडवा सिद्धार्थ आणि मितालीनं अनेकदा सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धार्थचा आज वाढदिवस.
सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त मितालीनं तर त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत, पण चाहते आणि इतर सेलिब्रिटींनी देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका मराठी अभिनेत्रीनं सिद्धार्थसाठी शेअर केलेली बर्थडे पोस्ट मात्र सध्या चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री आहे मृण्मयी देशपांडे. मृण्मयीनं तिच्या सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. काय आहे मृण्मयीची खास पोस्ट? मृण्मयीनं तिचा आणि सिद्धार्थचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ती लिहिते की, ‘आपण असे दिसत असल्या पासून ते आज पर्यंत… आपण आहोत.. आणि कायम असणारोत … माझ्या लाडक्या मित्रा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… असाच वेडा रहा.. मोठा नको होऊस… आणि माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे’.
या पोस्टवर अभिनेता आदिनाथ कोठारेनं देखील मजेशीर कमेंट केली आहे. ‘आणी तो आजही तुझ्याकडे असाच बघतो’, असं त्यानं म्हटलं आहे.यावर मृण्मयीनं आणखी एक गुपीत सांगितलं आहे. ते म्हणजे सिद्धार्थनं त्याच्या फोनमध्ये मृण्मयीचं नाव हिटलर असं सेव्ह केलं आहे. जग दोघांचे असे रचू … सिद्धार्थ-मितालीच्या नवीन आयुष्याची सुरुवात
सिद्धार्थ आणि मृण्मयी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर , हमनें जीना सिंख लिया, मिस यू मिस्टर या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं.