विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांचा एक रोमँटिक सिक्वेन्स यावेळी दिग्दर्शित करण्यात आला. या सिनेमातील रोमँटिक गाण्यादरम्यानचे हे शूट असावे असा अंदाज आहे. या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हे वाचा-२२ लाखांची बाइक ते १.५ कोटींची कार, सुशांतसिंह राजपूतला होतं लग्झरी गाड्यांचं वेड
आनंद तिवारी (Anand Tiwar) दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्यासह फराह खान देखील धमाल करत आहे. तिने विकी कौशलसह काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता. Rocking the boat असं कॅप्शन देत फराहने हा फोटो शेअर केला होता.

याशिवाय फराह खानसह या सिनेमाच्या संपूर्ण टीमने ‘तुमसे मिलके दिल का..’ या ‘मैं हू ना’ सिनेमातील गाण्यावर एक रील शूट केले होते. हा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
हे वाचा-मिताली-सिद्धार्थची मुंबई-पुणे Love Story! अभिनेत्रीची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट
विकी-तृप्तीचा रोमँटिक अंदाज
अशाप्रकारे या सिनेमाच्या शूटिंग लोकेशनवरुन विविध फोटो-व्हिडिओ समोर येत असले तरी सर्वाधिक चर्चा होत आहे या लीक झालेल्या फोटोंची. अभिनेता विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यावेळी इंटिमेट सीन शूट करताना दिसत आहे. या फोटोंमधून दोघांची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येते आहे. हे फोटो या सिनेमातील गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे आहेत. या फोटोंमध्ये विकीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची पँट कॅरी केली असून तृप्तीने पिवळ्या रंगाचा टू-पीस ड्रेस परिधान केला आहे.
फराह खानने याच ठिकाणावरुन काही दिवसांपूर्वी विकी कोशलसह एक फोटो पोस्ट केला होता. फराह खानने कतरिना कैफला या फोटोत टॅग केले होते. ज्यामध्ये फराहने म्हटलं आहे की, ‘सॉरी कतरिना कैफ विकी कौशलला दुसरी कुणीतरी भेटली आहे’. कतरिना कैफ हिने यावर मजेशीर रिप्लाय दिला होता. विकी कौशलच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी असण्याला तिने परवानगी दिली आहे. तिने फराहला असे म्हटले आहे की तुला परवानगी आहे. विकी कौशलने मात्र यावर आपण केवळ चांगले मित्र असल्याचे म्हटले होते. विकी, फराह आणि कतरिना यांच्यातील हा मजेशीर संवाद क्रोएशियामधून पोस्ट केलेल्या फोटोनंतरच झाला होता.

क्रोएशियामध्ये शूट होत असलेल्या या ‘रोला’ सिनेमबाबात बोलायचे झाले तर हा सिनेमा एक रोमँटिक कॉमेडी असणार आहे. ज्यामध्ये विकी एका लव्हर बॉयची भूमिका साकारत आहे. यामध्ये पंजाबी गायक आणि अभिनेता एमी विर्क देखील असणार आहे. ‘गोविंदा नाम मेरा’, ‘सैम बहादुर’ आणि ‘तख्त’ हे देखील विकी कौशल याचे अपकमिंग चित्रपट आहेत.