जळगाव : बनावट ई-मेल आयडी तयार करून जामनेर इथल्या दुकानदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाचा वापर करून महिलांची अंतर्वस्त्र मागविल्याचा प्रकार समोर आला आहे. कॅश ऑन डिलिव्हरी स्वरूपातील मागवलेली ही अंतर्वस्त्र थेट दुकानदाराच्या घरीच येत असल्याने दुकानदार त्रस्त झाला असून त्याने याप्रकरणी सोमवारी जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली तर यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानदाराने न मागवता घरपोच येणाऱ्या वस्तूंमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली असून त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.