पार्थ डोंगरे, वझे-केळकर कॉलेज

अफलातून विनोदकौशल्य आणि सहज अभिनयामुळे अभिनेतासंदीप पाठक मराठी मनोरंजनसृष्टीत ओळखला जातो. अनेक अस्सल ग्रामीण भूमिकांमधून त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. म्हणूनच प्रेक्षकांनाही तो आपला वाटतो. याचाच प्रत्यय संदीपला अलीकडे आला.

आंतरराष्ट्रीय भरारी! अभिनेता संदीप पाठकवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
महेश खुळखुळे या त्याच्या चाहत्यानं आपल्या उजव्या हातावर ‘संदीप पाठकचा फॅन’ असं कायमस्वरूपी गोंदवून घेतलंय. याबाबत संदीपनं सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘आपण आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत असतो कारण आपलं काम कुठेतरी नोंदवलं जाईल. पण आपलं नाव गोंदवलं जाईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं’, असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.


महेश संदीपचा अनेक वर्षांपासूनचा चाहता असून तो संदीपच्या नावे सतत उपक्रम आयोजित करत असतो. आपल्या या चाहत्याबद्दल संदीप म्हणाला, ‘१४ मेला मी मराठवाड्यात माझा वाढदिवस रक्तदान शिबीर आयोजित करून साजरा केला होता. त्यावेळी महेशची त्याच्या हातावर माझं नाव माझ्यासमोरच गोंदवून घ्यायची इच्छा होती. ती त्यानं मला बोलूनही दाखवली. तिथपर्यंतच न थांबता त्यानं टॅटूवाल्यालाही बोलावलं. तुम्ही माझं सर्वस्व आहात आणि ही माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाची भेट आहे, असं म्हणत त्यानं माझं नावं हातावर गोंदवून घेतलं. आपल्या चांगल्या कामाची पावती अशा प्रसंगांतून मिळत असते. मला कायम लोकाश्रय महत्त्वाचा वाटल्यामुळे लोकांमध्ये मिसळायला आवडतं. असे चाहते आपल्याला अंतर्मुख करतात.’
माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे…मिताली नव्हे तर या अभिनेत्रीची सिद्धार्थसाठी खास पोस्ट


मध्यंतरी संदीपचा ‘बेनवाड’ हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला; तेव्हा महेशनं मोठा पडदा लावून परिसरातील सर्वांना तो दाखवला. आज ‘रक्तदाता दिवस’ असून ‘संदीप पाठक फॅन क्लब’ अंतर्गत बीडमधील त्याचे काही चाहते रक्तदान शिबीर घेणार आहेत. संदीप स्वतःदेखील त्याला उपस्थित राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here