चंद्रपूरमध्ये ‘करोना’चा पहिला रुग्ण आढळून आल्याचं वृत्त काल अनेक ठिकाणी प्रसारित झालं होतं. वडेट्टीवार यांनी प्रशासकीय यंत्रणेकडं शहानिशा केल्यानंतर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून याबाबत खुलासा केला आहे. ‘मूळचा चंद्रपूरचा असलेला एक रुग्ण दोन-तीन महिन्यांपूर्वी इंडोनेशियाला गेला होता. तो भारतात परतल्यानंतर त्याच्या कुटुंबाला नागपूरमध्येच क्वारंटाइन करण्यात आलं. त्याची तपासणी झाल्यानंतर तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. तो नागपुरातच आहे. करोना रुग्ण म्हणून नागपूरमध्येच त्यांची नोंद झाली आहे. त्याचा चंद्रपूरशी संबंध नाही. तो चंद्रपुरात आलेला नाही. त्याला चंद्रपूरचा रुग्ण म्हणणं चुकीचं आहे. चंद्रपूरमध्ये आजच्या घडीला एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही,’ असं वडेट्टीवार म्हणाले.
वाचा:
‘चंद्रपूर जिल्हा सुरक्षित व करोनामुक्त ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. फक्त जनतेनं प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं. सहकार्य करावं. चंद्रपूरमधून आजपर्यंत तपासणीसाठी पाठवलेले सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. यापुढंही जिल्ह्यात करोनाला शिरकाव करू दिला जाणार नाही,’ असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times