मुंबई येथील एका कंपनीचे टँकर क्र.एम.एच.०४ के एफ ७५८८ घेऊन चालक अन्सारी हक्क समसुर हा पूर्णा येथील बळीराजा साखर कारखाना येथे आला होता. आपल्या टँकरमध्ये सुमारे २० ते २५ हजार लीटर मोलॅसिस भरुन तो मुंबईच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील पूर्णा नदीच्या बाॅम्बे पुलाच्या धोकादायक वळणावरुन सदरील टँकर हा ५० फुट खोल दरीत जाऊन कोसळला. हा अपघात एवढा भीषण होता की, या घटनेत टँकरचे मोठे नुकसान झाले. चालक अन्सारी हा टँकरच्या केबिन मध्येच अडकला होता.
घटना घडताच कानडखेड परिसरातील काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी चालक अन्सारी यास टँकरमधून बाहेर काढत त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे.
३० हजार पगार, ४४ लाखांचा विमा आणि ४ वर्षांची नोकरी; वाचा अग्निवीरांना काय- काय मिळणार!
२५ हजार लीटर मोलॅसिस गेले वाहून
कानादखेड शिवारातील पूर्ण नदी पत्रावरील बॉम्बे फुलावरील धोकादायक वर्णनावरून टँकर दरीत कोसळल्यामुळे २५ हजार लीटर मोलॅसिस वाहून गेले आहे. या अपघातामध्ये टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चालकर नांदेड येथे उपचार करण्यात येत आहेत.