नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. ही संख्या २३ आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची चिंता वाढवणाऱ्या मुंबईतील संसर्ग हळूहळू कमी होत असल्याचं चित्र आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत मुंबईत फक्त सहा नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रातील करोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात ४ जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर, ठाण्यात एक बाधित आढळून आला आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३२३६ झाली आहे.
मुंबईनंतर करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या पुण्यात आहे. मुंबईत रुग्णवाढ घटत असताना पुण्यात तसं काही दिसत नसल्यानं चिंता वाढली आहे. तिथं मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत तिथं ४८ रुग्ण दगावले आहेत. त्यातील एकट्या ससून रुग्णालयात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच ससूनमध्ये एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times