या सोहळ्यासाठी मुरलीधर राऊत यांनी आपलं हॉटेल, जेवण निशुल्क उपलब्ध करून दिलं. तर अमोल जमोदे यांनी डेकोरेशन तर महेश अंबेकर यांनी फोटोग्राफी निशुल्क करून देण्याची सोय केली. दुर्गाचे आई आणि वडील यांचा आजाराने मृत्यू झाला त्यानंतर ती आपल्या मोठया बहिणीकडे राहू लागली. बहिणीच लग्न कुठं लावावं, एवढा पैसा कुठून आणावा हा मुलीच्या बहिणीसाठी मोठा प्रश्न होता. मात्र, त्यांनी राऊत यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल ऐकलं आणि मुलीचा लग्न आज त्यांनी हाॅटेमध्ये पार पाडला. विशेष म्हणजे आपल्या संवेदनशील स्वभावामुळे ओळखले जाणारे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी या मुलीचे कन्यादान करून नव वरवधूला शुभाशीर्वाद दिले.
मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हे प्रसंग मुलीच्या बापाच्या जीवनात कसोटीचे असतात ते यासाठीच दुर्गा ही अशीच एक मुलगी. तिचे वडील भास्करराव तराळे (रा. व्याळा ता. बाळापूर) आणि आई प्रमिला या दोघांचे छत्र हिरावले गेले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. वधुपित्याच्या आत्मियतेने सहभागी झाले. पुरोहितांनी सांगितले त्याप्रमाणे विधीवत पूजा करुन जावई प्रविण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करुन दुर्गा ही कन्या जावई प्रविण यांच्या सुपूर्द केली. त्यानंतर व्याही विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचनही घेतले.
दरम्यान, मातापित्याचे छत्र असलेच म्हणजे मुलं मोठी होतात असे नव्हे, ती मोठी होतातच. अशीच दुर्गाही मोठी झाली. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वीच झाले होते. तिचे मेव्हणे व मामा यांनी मिळून तिच्या लग्नासाठी वर शोधण्यास सुरूवात केली. (कंचनपूर ता. खामगाव जि. बुलडाणा) चे विलासराव बहुरुपी यांचे चिरंजीव प्रविण यांचा या स्थळासाठी होकार आला. आता लग्न समारंभ करुन देण्याचा प्रश्न आला. अकोल्यातील व्याळ्या जवळच हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत हे दरवर्षी अनाथ मुलींचे लग्न समारंभ त्यांच्यावतीने करुन देतात. तेथेच हा विवाह सोहळा करण्याचे ठरले. त्यानंतर हळूहळू एकेकाची मदत भेटू लागली आणि हा लग्नसोहळा पार पडला.