१ कोटी १४ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दोंडाईचा ते नंदुरबार रस्त्यावर असलेल्या न्याहली गावाजवळ टाटा कंपनीचा पॅक बॉडी असलेला एमएच ४६ एफ ४८६८ या क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण १ लाख ३ हजार ६८० बाटल्या (२१६० बॉक्स) आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुद्देमालासह संशयित आरोपी रोहित जालिंधर खंदारे आणि अविनाश मोहन दळवे दोघे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील आहेत. या दोघेही संशयित आरोपींना अटक केली आहे. अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह एकूण १ कोटी १४ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
सदरची कारवाई कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, सुनिल चव्हाण संचालक राज्य उत्पादन शुल्क, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, सी.बी. राजपुत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे, युवराज राठोड अधीक्षक इत्यादींनी यशस्वीरीत्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी. जे. मेहता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत. सदरची कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, ९ ०, ९ ८ (२), १०३१०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.