रुमालने गळा आवळून १६ वर्षीय मुलाची हत्या
मिळालेल्या माहितीनूसार, मयत आणि दोन्ही आरोपींनी दि. ११ शनिवारी रोजी एक लोखंडी पाईप चोरी केला होता. तो पाईप चौदाशे रुपयात भंगाराच्या दुकानात विकला. पैसे आल्याने तिघांनी मद्यपानाचा बेत आखला. शनिवारी १२च्या सुमारास मोंढा नाका येथील वाईनशॉप मधून तिघांनी दारू खरेदी केली व रिक्षाने जाधववाडी येथे गेले. तेथे तिघांनी मद्यपान केले. दरम्यान, पाईप विकून मिळालेल्या पैशांची वाटणी करताना तिघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाताच आरोपींनी १६ वर्षीय युसूफचा रुमालने गळा आवळला त्यातच त्याचा मृत्यू झाला. युसूफ मृत झाल्याचे लक्षात येताच दोघांनी त्याचा मृतदेह झुडुपात लपवला.
दोघं आरोपींना बेड्या
मंगळवारी वास येत असल्याने नागरिकांनी झुडपात जाऊन पाहिले असता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह निदर्शनास आला. याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त होताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांची ओळख पटवत आरोपींना अटक केली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस उपयुक्त दीपक गिर्हे यांनी दिली.