ठाणे : शहरातील एका ५ वर्षीय मुलाचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील ओपन हाउस टेकडी बंगला या ठिकाणी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या या चिमुकल्याचा शाळेचा पहिला दिवस आणि त्याआधीच त्याच्या सोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे.

उद्या शाळेचा पहिला दिवस म्हणून आई बाबांनी नवीन गणवेश, शाळेची बॅग, वह्या, पुस्तक, पाण्याची बाटली, बास्केट, पावसाळ्यासाठी शूज, छत्री, रेनकोट अशी सगळी तयारी केली होती. मात्र, उद्याचा दिवस उजळण्याआधीच काळाने घाला घातला. ही दुर्दैवी घटना घडली आहे ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील ओपन हाउस टेकडी बंगला येथील गीता अपार्टमेंट इमारतीत. ५ वर्षीय चिमुकला हा गीता अपार्टमेंट या इमारतीच्या तळमजल्यावर राहात होता. खेळता खेळता पाचव्या मजल्यावर गेला आणि तोल जाऊन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण पाचपाखाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर, तिसऱ्या सामन्यात कोणता पराक्रम केला जाणून घ्या…
उद्या बुधवारी या चिमूकल्याचा आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस आणि शाळेची पहिली घंटा वाजण्याआगोदरच हा अपघात झाला. या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात या चिमूकल्याच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास नौपाडा पोलीस करत आहेत.

Father’s Day: वडिलांना बनवा ‘टेक्नोसॅव्ही’, फादर्स डे निमित्त भेट द्या या खास स्मार्टवॉच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here