सांगली : अनैतिक संबंधातून गुन्हे घडण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढत आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार सांगलीत समोर आला आहे. अनैतिक संबंधातून प्रियकराने गळा आवळून विवाहितेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताई सचिन निकम असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर राहुल सर्जेराव पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार, भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला होता. याबाबत अधिक चौकशी केली असता प्रियकराने हत्या केल्याचं समोर आलं आहे.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मयत महिलेचा पती व नातेवाईक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. यावेळी ताई ही विटा इथं भाड्याच्या घरात राहत होती आणि हॉटेलमध्ये भाकरी, चपाती करण्याचे काम करायची. या प्रकरणात आणखी चौकशी केली असता एका ज्वेलर्सचा मालक राहुल पवार याचं ताई निकम हिच्याशी अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये सारखे फोन कॉल सुरू असायचे. यावरुन राहुल सर्जेराव पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुमारे दीड वर्षापासून ताई सचिन निकम हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले.

अरबी समुद्र खवळला!, तीन दिवस मोठी भरती; उसळणाऱ्या उंच लाटा घाबरवणार!
३ मे रोजी ताई ही राहुलच्या दुकानात आली होती. तिने राहुलकडे तिच्या वाढदिवासाकरिता एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली होती. मात्र, राहुलने नकार दिला. अंगठी न दिल्याच्या कारणावरून तिने प्रेम संबंधाबाबत त्याच्या वडिलांना सांगेन असा दम दिल्याचे राहुलने सांगितले. यानंतर ५ मे रोजी राहूल पवार आणि ताईमध्ये वाद झाला.

प्रेमसंबंधाबाबत वडिलांना सांगेन, अशी धमकी देत असल्याच्या कारणावरून त्याने गाडीतच ताई निकमच्या गळ्यातील ओढणीनेच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतून भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात पुलावरुन टाकून दिल्याचे राहुलने सांगितले. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

पीएसआय असल्याचे भासवून ट्रकचालकाने केले दुसरे लग्न, नंतर झाला पसार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here