कुठे थांबला पाऊस?
२९ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटकच्या काही भागासह गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. यावेळीही मान्सूनने दहा दिवसांचा ब्रेक घेतला. हवामान अनुकूल झाल्यानंतर मान्सून शुक्रवारी वेंगुर्ल्यात दाखल झाला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत म्हणजे शनिवारी मान्सून मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय झाला. पण रविवार, सोमवार आणि मंगळवारी पाऊस बेपत्ता झाला असून, मुंबईत तर कडाक्याच्या उन्हामुळे उष्णता वाढत आहे.
पश्चिम किनार्यावर ५ दिवसांत वादळी पावसाची शक्यता…
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनार्यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली येत्या ५ दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून दाखल झाल्यानंतर सध्या पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर द्रोणीय स्थिती तसेच पश्चिमेकडून वाहणारे वारे यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची उपस्थिती असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील चार तास अलर्ट; जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस