मुंबई: एखादया सिनेमाची किती उत्सुकता असावी, सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो पडद्यावर येईपर्यंत सिनेमा किती चर्चेत असावा, टीझरमधल्या गाण्याला प्रेक्षकांनी किती डोक्यावर घ्यावं आणि आता ट्रेलर प्रदर्शित होताच त्याच्यावर नेटकऱ्यांच्या किती उड्या पडाव्यात याची काहीही सीमा नसल्याचं सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या हॉट (Alia Bhatt And Ranbir Kapoor Movie) जोडीचा पहिला सिनेमा म्हणून चर्चेत असलेल्या ब्रह्मास्त्रपार्ट वन या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांनीच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणला आहे. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरने (Brahmastra trailer) प्रेक्षकांना या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. ये तो ट्रेलर है बॉस, पिक्चर अभी बाकी है दोस्त ही म्हण ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरला लागू पडत असल्याचं सध्या सोशल मीडियावरील लाखो लाइक्समधून दिसतंय.

हे वाचा-मुंबईच्या ट्रॅफिकला वैतागले वरुण- कियारा, मेट्रोमधूनच केला प्रवास

आलिया भट्ट रणबीर कपूर

गेल्या पाच वर्षापासून ब्रह्मास्त्र या सिनेमाची जोरदार चर्चा होती. अयान मुखर्जीचा सिनेमा म्हटलं की काहीतरी हटके असणार हे समीकरण आता पक्कं झालंय. तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना फक्त पडदयावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही एकत्र आणलं ते या सिनेमानं. रणबीर आणि आलियाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठीही त्यांचे चाहते आतूर आहेत. दोन महिन्यांपूर्वी रणबीर आलियाचं लग्न झालं तेव्हाही ब्रह्मास्त्रचीच चर्चा होती. ‘केसरिया तेरा इश्क है’ या गाण्याने तर आधीच धमाल उडवून दिली आहे. आता ट्रेलर रिलीज झाल्याने ब्रह्मास्त्रवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस पडत आहे. चाहते हा सिनेमा ‘ब्लॉकबस्टर’, ‘सुपरहिट’ असल्याचे म्हणत आहेत.

या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरची दमदार सुरूवात झाली आहे. ते म्हणताहेत, जल, वायू, अग्नि.. प्राचीन काल से हमारे बीच कुछ ऐसी शक्तिया है जो अस्त्रों मे भरी हुई है. ये कहानी ये सारे अस्त्रों के देवता की .. ब्रह्मास्त्र. और एक ऐसे नौजवान की जो इस बात से अनजान है की वो ब्रह्मास्त्र की किस्मत का सिकंदर है. बिग बी यांच्या आवाजात हे शब्द आणि जोडीला सिनेमातील अंगावर शहारे आणणारी दृश्य यांचा मेळ या ट्रेलरमध्ये अचूक साधला आहे. या सिनेमातील विविध पात्रांचे कौतुकही चाहते करत आहेत.

हे वाचा-आज सगळ्यांसमोर येणार बिश्नोई, सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात होईल मोठा खुलासा

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या सीनमुळे प्रेक्षक चांगलेच खुश झाले आहेत. ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच रणबीर कपूरनेही खास व्हिडिओ शेअर करत या सिनेमाबद्दल त्याला असलेली उत्सुकता सांगितली आहे. नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही या सिनेमात खास भूमिका आहेत. शाहररूख खान या सिनेमात एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजून त्याचा या सिनेमातील लुक जाहीर केलेला नाही.

Brahmastra Team

‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. रिलीज होण्यासाठी अजून दोन महिने असले तरी या ट्रेलरने बॉलिवूडप्रेमींना स्पेशल ट्रीट दिली आहे. सोशल मीडियावर ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

ब्रह्मास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here