लखनऊ: अयोध्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे बुधवारी सकाळी ११ वाजता लखनऊ विमानतळावर दाखल झाले. आदित्य ठाकरे विमानतळाच्या बाहेर पडताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरले. यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना अयोध्या दौऱ्याचा उद्देश विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. यामध्ये राजकारणाचा कोणताही भाग नाही. हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येत येत आहोत. आतादेखील मी फक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला आलो आहे. प्रभू श्रीरामाच्या भूमीत मी कोणतेही राजकीय आरोप-प्रत्यारोप करणार नाही. आमच्या हातातून चांगले कार्य घडू दे, एवढीच प्रार्थना मी श्रीरामाच्या चरणी करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यानंतर आदित्य ठाकरे ‘जय सियाराम’चा नारा देत अयोध्येच्या दिशेने मार्गस्थ झाले.

दरम्यान आदित्य ठाकरे लखनऊ विमानतळावर आल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई, नाशिक आणि पुण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामुळे आज दिवसभर अयोध्येत शिवसेनेकडून मोठ्याप्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
‘श्रीरामाने द्वेषाचं नव्हे तर समन्वयाचं राजकारण केलं, आजच्या राजकारणात विरोधकांवर बुलडोझर फिरवले जातात’
युवासेना करणार शरयू नदीच्या काठी शक्तिप्रदर्शन

आदित्य ठाकरे आज दुपारी ते रामलल्लाचे दर्शन घेणार असून तत्पूर्वी रामनगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शनदेखील घेतील.या दौऱ्याच्या निमित्ताने बुधवारी रात्री युवा सेनेकडून शरयू नदीच्या काठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी मंगळवार सकाळपासून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात लखनऊत दाखल झाले आहेत. लखनऊ येथे पोहोचल्यानंतर अयोध्या येथील पंचशील हॉटेलात ते थांबणार असून दुपारी ३.३०च्या सुमारास ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Aaditya Thackeray Ayodhya Visit Today Live Updates

साडेपाच वाजता ते अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीला भेट देणार असून रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते येथील काही साधूसंताची भेट घेतील. संध्याकाळी ते शरयू नदीकाठी भेट देणार असून आरती सोहळ्यात सहभागी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here