मुंबई: निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांचा लेक अनिकेत चार वर्षांनी मायदेशी परत आला होता. याला कारणंही तितकंच खास होतं. अशोक सराफ यांनी नुकताच त्यांचा ७५ वाढदिवस साजरा केला. अशोक मामांचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला.
करणवीर बोहरासह ६ जणांवर गुन्हा दाखल, महिलेने पैसे परत मागितले तर दिली गोळी घालण्याची धमकी
बर्थडे सेलिब्रेशन आणि काही दिवस आई वडिलांसोबत घालवल्यानंतर अनिकेत पु्न्हा परदेशी गेला. त्याला विमानतळावर सोडण्यासाठी आलेल्या निवेदिता आणि अशोक मामांचा फोटो खूप काही सांगून जात आहे. चार वर्षानंतर अनिकेत घरी आला होता. काही दिवस राहिल्यानंतर तो पुन्हा त्याच्या कामानिमित्त परदेशात गेला. त्याला बाय करताना निवेदिता यांच्या भावना नेमक्या काय असतील हे फक्त एक आईच समजू शकते.

निवेदिता यांनी अनिकेत सोबतचा एक फोटो शेअर करत एका ओळीत त्यांच्या भावना शेअर केल्या आहेत. ‘या जगात सर्वात अवघड गोष्ट म्हणजे आपल्या लेकराला बाय म्हणणं’ असं निवेदिता यांनी म्हटलं आहे.

शेफ आहे अनिकेत
आई -वडिल अभिनयाच्या क्षेत्रातील मोठी नाव असताना अनिकेतनं मात्र करिअरची वेगळी वाट निवडली. अनिकेत शेफ आहे. निवेदिता यांना स्वयंपाकाची आवड आहे हे सर्वांनाच माहित आहे, पण अनिकेतनं त्याचं करिअर म्हणून याची निवड केली. अनिकेतचं शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झालं तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचं जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर ‘निक सराफ’ या नावाने त्याचे व्हिडिओही आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here