दिशानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर चार फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दिशानं लाल रंगाचा आऊटफिट घातला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिनं लाल रंगाची बिकिनी (Disha Patani Bikini Photos) घालून तिची आकर्षक फिगर दाखवत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दिशानं गुलाबाचं फुल हातात घेतलेलं दिसत आहे.
चाहत्यांनी केल्या भरभरून कॉमेन्ट
एका चाहत्यानं दिशानं शेअर केलेल्या फोटोवर कॉमेन्ट करताना लिहिलं आहे की, ‘हॉटनेस ओव्हरलोड’ तर अनेक चाहत्यांनी फायरच्या इमोजी कॉमेन्टमध्ये शेअर केल्या आहेत. दिशाचा हॉटनेस पाहून नेटकरी तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. अर्थात याही आधी दिशानं अनेकदा बिकिनीमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु लाल रंगाच्या बिकिनीमधील दिशाचा लुक अधिक बोल्ड आणि आकर्षक दिसत आहे.
दिशा पाटनीनं १३ जून २०२२ रोजी तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ यानं अतिशय रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. तसंच त्या दोघांचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं होतं,’यावर्षी तुझी उत्तुंग अशी झेप घेशील…वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अॅक्शन हिरो!’