सदरील घटनेवषयी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, परभणी शहरातील न्यू संभाजी नगर भागामध्ये वास्तव्यास असणाऱ्या दिनेश आंभोरे याने दारूचे अतिसेवन केल्यानंतर राहत्या घरामध्ये लाकडी अडूला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे न्यू संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिनेश अंभोरे याची आई सुनंदा अंभोरे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक विशाल गायकवाड करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सेलू शहरामध्ये दारूचे अती सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १४ जून रोजी आली होती. त्यानंतर परभणी शहरातील न्यू संभाजी नगर येथे दारूच्या नशेत युवकाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.