नवी दिल्ली: गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात रग्बी सामन्यात सामना सुरू असताना एक महिला चक्क टॉपलेस होऊन मैदानात घुसली. संबंधित घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. मैदानावर अशाच प्रकारची घटना पुन्हा एकदा घडली आहे. यावेळी देखील एका महिलेने कपडे काढण्याचा प्रकार केला.

मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेले चाहते आवडत्या संघाच्या विजयानंतर जल्लोष करताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. विजयाचा जल्लोष करताना काही चाहते मात्र मर्यादा ओलांडतात. अमेरिकेत एका बेसबॉल सामना सुरू असताना स्टेडियममध्ये महिलेने अश्लील प्रकार केला. पाठिंबा देणाऱ्या संघाचा विजय होणार हे पाहताच संबंधित महिलेने कपडे काढण्यास सुरुवात केली.

वाचा- टॉपलेस होऊन महिला Live सामन्यात मैदानात घुसली; फोटो, व्हिडिओची जगभरात चर्चा

कॅलिफोर्नियाच्या डोजर्स स्टेडियममध्ये लॉस एजिल्स आणि शिकागो व्हाइट सॉक्स यांच्यात लढत झाली. सामना सुरू असताना संघाचा विजय मिळणार याची खात्री झाल्यावर एक महिला चाहती आनंदी झाली आणि नाचू लागली. महिलेचा हा जल्लोष कॅमेऱ्याने देखील कैद झाला. काही वेळातच तिने कपडे काढण्यास सुरूवात केली. हा प्रकार लक्षात येताच मैदानावरील सुरक्षा कर्मचारी धावत आले आणि तिला रोखले.

वाचा- द.आफ्रिकेचा अंदाज चुकला; पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने दिला दणका, पाहा व्हिडिओ

वाचा- १० महिन्यांचा ब्रेक, २ देशात सराव; ऑलिम्पिकनंतर थांबला नाही नीरज आणि घडवला इतिहास

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखण्याआधीच महिलेने अंगावरील काही कपडे हटवले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रोखले आणि मैदानाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेला स्टेडियमबाहेर जायचे नव्हते म्हणून तिने विरोध देखील केला पण अखेर सुरक्षा रक्षकांनी तिला उचलून स्टेडियम बाहेर नेले. हा प्रकार सुरू असताना चाहती मोठ मोठ्याने ओरडत होती. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here