मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत मान्सूनने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळतं. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मान्सून गायब झाला आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या ५ दिवसांमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडला गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या अंदाजानुसार तरी पाऊस होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, १९ जून रोजी विदर्भात तर १५ ते १७ जून दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून आज १५ जून २०२२ रोजी मराठवाडा, संपूर्ण कर्नाटक आणि रायलसीमा आणि तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेशचा काही भाग, वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे.

Monsoon 2022 Update : मान्सून महाराष्ट्रावर नाराज, धमाकेदार एन्ट्रीनंतर झालं तरी काय?
विदर्भ आणि तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ओडिशाचा काही भाग, गंगेचा पश्चिम बंगाल, झारखंड, संपूर्ण उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तर पुढील २-३ दिवसांत बिहारच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे थांबला पाऊस?

२९ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटकच्या काही भागासह गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. यावेळीही मान्सूनने दहा दिवसांचा ब्रेक घेतला. हवामान अनुकूल झाल्यानंतर मान्सून शुक्रवारी वेंगुर्ल्यात दाखल झाला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत म्हणजे शनिवारी मान्सून मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय झाला. पण रविवार, सोमवार आणि मंगळवारी पाऊस बेपत्ता झाला असून, मुंबईत तर कडाक्याच्या उन्हामुळे उष्णता वाढत आहे.

सदाभाऊ खोतांना मानलं, विधानपरिषदेचा अर्ज मागे घेताच पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here