नागपूर : ‘ई सेवा केंद्रा’चे नाव बदलून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ झाले असतानाही बनावट वेबसाईटच्या माध्यमातून जुन्याच नावाने केंद्र वाटप करणारे रॅकेट सक्रिय असल्याची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तामध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने वेबसाईट बंद करून दोषींवर कारवाईची प्रकिया सुरू केली आहे. ज्यांनी या वेबसाइटच्या माध्यमातून पैसे भरले त्यांचे पैसे तात्काळ परत करण्याचे आदेशही केंद्र चालकाला देण्यात आले आहेत.

४ हजार रुपयांत तीन वर्षांसाठी केंद्र वितरित करण्याचे दावे esvekendra.net या वेबसाईटच्या माध्यमातून करण्यात आले होते. या वेबसाईटची पोलखोल ‘मटा’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आल्यानंतर यात अनेकांची फसवणूक झाल्याचंही पुढे आले होते. या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे उकळण्यात येत होते. कुणाकडून ४ हजार तर कुणाकडून १० हजारांचीही मागणी केली जात होती. प्लॉट क्रमांक ८२, मानेवाडा नागपूर केवळ एवढाच पत्ता या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. संपर्कासाठी ९९३००६२१४४ हा मोबाइल क्रमांक देण्यात आला होता.

अयोध्येत ‘महाराष्ट्र सदन’ व्हावं, उद्धव ठाकरे योगींशी बोलणार, जागा मागणार : आदित्य ठाकरे
तासाभरात रॅकेटचा पर्दाफाश…

‘मटा’च्या वृत्ताची दखल घेऊन तहसीलदार सूर्यकांत पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील महाआयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उमेश घुगुसकर, गणेश इनकाने यांच्या पथकाने वेबसाईटवर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. दिलेल्या पत्त्यावर पथक पोहोचले आणि चौकशी केली. हे संकेतस्थळ १५ जून रोजी मोठ्या प्रमाणावर लॉंच करण्याचे नियोजन सुरू होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या ३९ वर्षीय विजय पळसकर या युवकाने महाऑनलाइन सारखे दिसणारे संकेतस्थळ तयार केले.

अजित दादांचं भाषण देवेंद्र फडणवीसांनीच कापलं; सुनिल शेळकेंनी घटनाक्रमच सांगितला

पथक पोहोचल्यानंतर अवघ्या एका तासात हे संकेतस्थळ बंद करण्यात आले. चौघांकडून घेतलेले पैसेही परत करण्यात आले. ज्यांनी या संकेतस्थळावर नोंद केली त्यांच्याशी संपर्क साधून पैसे भरू नका, असं सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे हे प्रकरण पाठविण्यात येणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितलं आहे.

मोबाइल नंबरशिवाय ‘असे’ डाउनलोड करा Aadhaar Card, पाहा प्रोसेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here