औरंगाबाद : १ कोटी १५ लाखाची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या एका ५८ वर्षीय वृद्धाला तब्बल ३४ लाख ६ हजार ४९७ रुपयांचा गंडा घातला असल्याची घटना हर्सूल भागात समोर आली आहे. तर दुसरीकडे भाजीपाला व्यावसायिकाच्या मोबाईलवर फेक लिंक पाठवून बँकेतून बोलत असल्याची थाप मारून सायबर क्राईम करणाऱ्या अज्ञात भामट्यांनी बँक खात्यातील ८६ हजाराची रक्कम लंपास केली. मात्र, सायबर पोलिसांनी व्यापाऱ्याची गेलेली रक्कम अवघ्या ४८ तासात पुन्हा मिळवून दिली आहे.

लॉटरी लागल्याचे आमिष देत निवृत्त वृद्धाला ३४ लाखाला फसविले…

१ कोटी १५ लाखाची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या ५८ वर्षीय वृद्धाला तब्बल ३४ लाख ६ हजार ४९७ रुपयांचा गंडा घातल्याची घटना हर्सूल भागात समोर आली आहे. याप्रकरणी आय.टी. ऍक्टसह विविध कलमाखाली अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर मारोती खंडागळे वय-५८ (रा. सिद्धेश्वरनगर, जाधववाडी, हर्सूल) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

अजितदादांचं भाषण झालं नाही, फडणवीस मास्टरमाईंड, सुनिल शेळकेंनी घटनाक्रमच सांगितला
‘कौन बनेगा करोडपती’ या नावाने मेसेज आला होता

मिळालेल्या माहितीनुसार, खंडागळे यांना जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर ‘कौन बनेगा करोडपती’ या नावाने मेसेज आला होता. त्यात ३३ लाख आणि ५१ लाख असे दोन लकी ड्रॉ लागले आहे आणि त्यासाठी बक्षीस स्वीकारण्यासाठी एक नंबर वर कॉल करण्यास संगण्यात आलं होतं. त्यांनी त्या मेसेजवर विश्वास ठेवून कॉल केला असता तुम्हाला १ कोटी १५ लखाचे बक्षीस मिळणार आहे. यासाठी अगोदर १ लाख ७० हजार रुपये भरावे लागतील असं समोरील व्यक्तीने सांगितलं. त्या सायबर भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी खंडागळे यांनी एकूण ३४ लाख ६ हजार ४९७ रुपये सांगितलेल्या बँक खात्यात भरले. मात्र, आजपर्यंत एकही रुपया न भेटल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी फिर्याद दिली. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात विविध मोबाईल क्रमांक धारक आणि बँक खाते धारक यांच्या विरोधात फसवणूक, आय.टी. ऍक्ट सह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Gangajal : आता रोहित पवारांचे ‘गंगाजल अभिषेक’ अभियान, तीर्थक्षेत्रांबाबत सुचली ‘ही’ कल्पना
दुसरीकडे भाजी व्यापाऱ्याला ८६ हजाराला गंडवलं

अलिकडच्या काळात सायबर क्राईम करणारे विविध लिंक मोबाईलवर पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याचं प्रमाण वाढले आहे. मात्र, अनेकजण तात्काळ पोलिसांकडे तक्रार करीत नसल्याने त्या पैशांचा शोध घेणे अवघड होऊन जाते. मात्र, फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांची मदत घेतल्यास फसवणूक झालेली रक्कम अवघ्या काही तासात मिळते, असाच प्रत्यय औरंगाबादेतील सैफ खान या भाजीपाला व्यापाऱ्याला आला आहे. खान यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून लिंक आली. त्यानंतर एक कॉल आला व समोरील व्यक्तीने बँकेतील अधिकारी बोलत असल्याची थाप मारत खान यांचा विश्वास संपादन केला.

रात्री बस बिघडली, मेकॅनिक शोधायला निघालेल्या कंडक्टरला कारने उडवलं, तडफडून मृत्यू
त्यानंतर त्याने ती लिंक उघडून त्यातील माहिती भरण्यास सांगितली. सांगितल्याप्रमाणे खान यांनी माहिती भरताच त्यांच्या खात्यातून ८६ हजार रुपये कपात झाल्याचा मेसेज आला. खान यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच खान यांनी सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीच्या इ-वाॅलेटचा शोध घेऊन तो फ्रीज केला त्यानंतर कपात झालेली रक्कम अवघ्या ४८ तासाच्या आत खान यांच्या खात्यात वळवली. गेलेली रक्कम परत मिळाल्याने खान यांनी सायबर पोलिसांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here