School First Day:   पुणेकर,  (Pune)पुणेकारांच्या गोष्टी, त्यांनी केलेले अपमान, त्यांच्या भन्नाट करामती आणि त्यासोबतच त्यांनी केलेले कौतुकास्पद आणि धैर्यवान कार्य याचे किस्से आपण कायमच ऐकतो. पुणेकरांनाचं असल्या भन्नाट कल्पना सुचू शकतात, असंही अनेकजण म्हणतात. मात्र हे तितकंच खरं देखील आहे. आज नव्या शालेय वर्षाचा पहिला दिवस होता. अनेक घरात प्रचंंड गडबड सुरु होती. अनेकांच्या घरासमोर बस, रिक्षा वाट बघत होत्या मात्र पियुष शाह यांच्या मुलीची वाट घोडा बघत होता.  मीरा शाह पहिल्यांदाच शाळेत जाणार असल्याने तिच्या वडिलांनी तिला थेट घोड्यावरुन शाळेत सोडलं. फक्त घोडाच नाही तर तिच्या आजुबाजुला शाही थाटातील अब्दगिरीसुद्धा होते. 

 

मीराने घोड्यावर बसून राजेशाही पद्धतीने शाळेत प्रवेश घेतला. तिचा असा हटके प्रवेश पाहून अनेकजण अवाक झाले होते. चार वर्षीय मीरा पहिल्यांच तिच्या शालेय जीवनाची सुरुवात करत असल्याने शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करावा या हेतूने तिच्या आई-वडिलांनी थेट घोडा बुक केला आणि राजेशाही थाटात लेकीचा शाळेत प्रवेश केला. पाठीवर दप्तर, हातात बॅग घेत उत्सादात मीराने शालेय जीवनाची सुरुवात केली. शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश शाळेतील सगळ्यांनी मीराला बघण्यासाठी गर्दी जमली होती. पीयुष शाह आणि गंधाली शाह असं तिच्या आई-वडिलांचं नाव आहे. आई गृहिणी असून वडिल प्रॉडक्ट मार्केटिंग करतात.

आजपासून राज्यातील शालेय वर्षाची सुरुवातल झाली. शाळेच्या आवारात पुन्हा एकदा घंटानाद झाला आणि शाळा भरली. अनेक बालकांचं आज औपचारिक शिक्षणाच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले. शाळेत विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कोरोनानंतर पहिल्यांदाच शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांबरोबरच शाळेतील या शालेय वर्षासाठी शिक्षकही आतुर होते. या विद्यार्थ्याचं प्रत्येक पहिलं पाऊल देश घडवण्यात मदत करणार आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्या आणि सामाजिक दृष्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याकडे अनेक शिक्षकांचा कल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here