‘गाडीमध्ये एक महिला आणि तिचे छोटेसे बाळ आहे’
हा सर्व प्रकार वसंत मोरे काही वेळ पाहात होते. त्यानंतर त्यांना थोडी शंका आली. त्यांनी जवळ जाऊन त्या गाडीच्या कंडक्टरला विचारले की, ‘काय झालं काय प्राॅब्लेम आहे’. त्यावर त्या कंडक्टरने सांगितले की, ‘आम्ही आत्ताच सासवडहून ट्रिप करून आलो आहोत. गाडीमध्ये एक महिला आणि तिचे छोटेसे बाळ आहे. त्या इकडे बाजूला राहतात. त्यांना कात्रज परिसरातील राजस सोसायटीजवळ आल्यावर त्यांचा दिर त्यांना घ्यायला येणार आहे. म्हणून आम्ही थांबलो आहोत. पण १५ मिनिटं झाले तरी कोणीही आले नाही त्यांना न्यायला. त्यामुळे आम्हाला धड गाडीही सोडता येईना आणि आम्हाला घरीही जाता येईना’, असं त्या कंडक्टरने मोरेंना सांगितलं.
वसंत मोरेंनी मानले आभार
हा सर्व प्रकार वसंत मोरे यांच्या लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला आणि मुलाला स्वतःच्या गाडीत बसवले आणि त्यांना सुखरूप घरी सोडले. वसंत मोरेंनी त्या पीएमपीएमएलच्या कंडक्टर आणि ड्राइव्हरचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. त्या दोघांची नावे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर अशी आहेत.
खरं पाहायला गेलं तर आजच्या जगात एकटी महिला दिसली की लोकांच्या नजरा बदलतात. मात्र, या बसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरने जे भावासारखे नात दाखवून आपलं काम संपूनही त्या महिलेसोबत तिच्या घरच्यांची वाट पाहात होते. या घटनेवरून असं वाटतं की, माणुसकी अजूनही या जगात शिल्लक आहे. दरम्यान, त्यांनतर ‘घरच्यांनी देखील एकटी महिला आणि कुणी त्यांच्यासोबत लहान मूल असेल तर त्यांना एकटे पाठवू नका, एवढे निष्काळजी होऊ नका’, असे आवाहन वसंत मोरे यांनी केले आहे.