शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टीचं मोठं काम आहे तर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटातून त्यांनी नेमकेपणाने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. दरम्यान भेटीत दोन्ही शेतकरी पुत्रांमध्ये शेती मातीच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या. सध्याच्या शेतकरी प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ शेट्टी पहिल्यांदाच यानिमित्ताने प्रकाशझोतात आले.
मी ज्यांचा चाहता तेच माझ्या वडिलांचेच मोठे चाहते निघाले…! : सौरभ शेट्टी
“काल कामानिमित्त राजू शेट्टी साहेबांसोबत पुण्याला आलो होतो. गाडीमध्ये बसताना सरसेनापती हंबीरराव या चित्रपटासंदर्भात चर्चा रंगली. हंबीरराव मोहिते यांची अभिनय करणारे अभिनेते प्रवीण तरडे यांच्या अभिनयाचे मी खूप कौतुक केलं. आणि मी इच्छा व्यक्त केली की मला आज भेटायचं आहे आणि साहेबांनी प्रवीण तरडे यांना फोन केला वटवृक्ष एंटरटेनमेंटचे मालक देऊळ बंद पिक्चर निर्माते बापू वाणी यांच्या घरी भेटायचं ठरलं”.
“बापू वाणी यांच्या घरी पोहोचताच बापू आणि प्रवीण तरडे यांनी साहेबांचे स्वागत करून घट्ट मिठी मारली आणि तेवढ्यात साहेबांनी माझी ओळख करून दिली. तेवढ्यातच प्रवीण तरडे म्हणाले “बाळा तू माझाच आहेस पण मी तुझ्या वडिलांचा खूप मोठा चाहता आहे ज्या पद्धतीने शेती साहेब शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी लढतात त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे” असं म्हणत त्यांनी साहेबांच्या कामाचं कौतुक केलं”.
“तब्बल दीडदोन तास आम्ही चर्चा केली गप्पा मारल्या आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांना आणि मला सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील काही क्षण टीव्हीवर दाखवले. या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल मा. राजू शेट्टी साहेबांनी प्रवीण तरडे यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या”