रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथे एका वृध्द महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचं धक्कादायक कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पोटच्या मुलांच लग्न व्हावं, संसार उभा रहावा यासाठी आईने बरेच प्रयत्न करूनही लग्न जमत नसल्याने नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 

As the child does not get married Suicide by hanging mother Ratnagiri news (1)

मुलाचं लग्न जुळत नाही, आईचं धक्कादायक पाऊल…

हायलाइट्स:

  • रत्नागिरीमधील गुहागर तालुक्यात वृध्द महिलेची आत्महत्या
  • पोटच्या मुलांच लग्न जमत नसल्यामुळे उचललं चूकीचं पाऊल
रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथे एका वृध्द महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचं धक्कादायक कारण पुढे आले आहे. पोटच्या मुलांच लग्न व्हावं, संसार उभा रहावा यासाठी आईने बरेच प्रयत्न करूनही लग्न जमत नसल्याने नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद आज बुधवारी १५ जून रोजी गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

भार्गिथी गोविंद आंबेकर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. गुहागर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे. भार्गिथी आंबेकर या सोमवारी १३ जून दुपारी साडे तीन वाजल्यापासून बेपत्ता होत्या. मंगळवारी सकाळी १० वाजता किंजळीच्या झाडाला साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला.
‘संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि…’; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उलगडले आघाडीचे गुपित
भार्गिथी आंबेकर, त्यांचा मुलगा व मावशी असे तिघेजण एकत्र राहत होते. मुलाचे लग्न जमत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.

Smartphone Tips : स्लो स्मार्टफोनचे टेन्शन विसरा, स्पीड होणार सुपरफास्ट, फॉलो करा ‘या’ सोप्पी टिप्स

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : as the child does not get married suicide by hanging mother ratnagiri news
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here