Vidhanparishad Election 2022 | विधानपरिषेदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना हाताशी धरून मतांची जुळवाजुळव कशाप्रकारे करायची याची रणनीती आज वर्षा बंगल्यावरही बैठकीत आखली जाईल. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना १८ जून रोजी मुक्कामासाठी मुंबईत दाखल होण्याचा आदेश दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरुवात केली आहे.

 

Uddhav Thackeray feature (2)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • विधानपरिषेदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत
  • दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावली
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत सत्ता आणि संख्याबळ असूनही पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विधानपरिषद निवडणुकीसाठी अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस रंगणार आहे. ही जागा भाजपने जिंकल्यास अपक्ष आमदार आणि लहान पक्षांवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होईल. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रतिमेला मारक ठरू शकते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानपरिषद निवडणुकीत बाजी मारण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Vidhanparishad Election 2022)
मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे भडकले
या बैठकीला महाआघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. विधानपरिषेदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना हाताशी धरून मतांची जुळवाजुळव कशाप्रकारे करायची याची रणनीती आज वर्षा बंगल्यावरही बैठकीत आखली जाईल. त्यामुळे या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोणत्या सूचना देतात, हे पाहावे लागेल.
देवेंद्र भुयार मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘उद्धवसाहेब निधी नको, पण तुमच्या भेटीची वेळ द्या!’
तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना १८ जून रोजी मुक्कामासाठी मुंबईत दाखल होण्याचा आदेश दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या दोन दिवस आधीच म्हणजेच १८ जूनला पक्षाच्या सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पवई येथील हॉटेल रिनेसन्समध्ये मुक्कामी बोलावले आहे. याच हॉटेलमधून सर्व आमदार विधान भवनात मतदानासाठी जाणार आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : uddhav thackeray will make plan to defeat bjp devendra fadnavis in vidhanparishad election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here