जालना : जालना जिल्ह्यातील काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. इथं लग्न मंडपात लेकीच्या लग्नाच्या मंगलाष्टका सुरू असताना रोडवर वधुपित्याला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. लेकीच्या डोक्यावर अक्षदा पडत असतानाच पित्यावर काळाचा घाला आल्याने लेक जावयासह सारे वऱ्हाडी निशब्द झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन-जाफराबाद मुख्य रस्त्यावरील विरेगाव इथं मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान एका इसमाला अज्ञात भरधाव वाहनाने चिरडलं. राजू शेषराव खंडागळे वय ४८ असं मयत वडिलांचं नाव आहे. एकीकडे लग्न मंडपात वऱ्हाडी, नातेवाईक नवदाम्पत्यावर अक्षदाचा वर्षाव करत होते, मंगलाष्टक चालू होत्या. अशात कामानिमित्त वधुपिता पायी चालत रोडवर आले. तेवढ्यात भरधाव वेगाने त्यांना चिरडून पोबारा केला.

Monsoon Update : राज्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईसह ‘या’ भागांत वरुणराजा बरसला
रोडवर गर्दी जमलेली पाहताच लग्नातील नातेवाईक, पाहुण्यांनी धाव घेतली असता यानंतर जे दिसलं ते काळीज पिळवटून टाकणारं होतं. तातडीने राजू यांना रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हा अपघात इतका भयंकर होता की खंडागळे यांना डोक्याला जबरदस्त फटका बसला. खंडागळे यांच्या जाण्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पाश्चात पत्नी, आई, दोन मुलं, तीन मुली असा परिवार आहे. लेकीच्या लग्नातच पित्यावर काळाने घाला घातल्यामुळे साऱ्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलाचं लग्न जुळत नाही, आईचं धक्कादायक पाऊल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here