उल्हासनगर : लग्नासाठी वारंवार बोलणाऱ्या प्रेयसीची हत्या करून कारमध्ये मृतदेह ठेवून लपवण्यासाठी शहरात इकडे-तिकडे फिरणाऱ्या प्रियकराला हिललाइन पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सचिन गोरखनाथ खाजेकर (४०) याचे आशा मोरे नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. सचिन ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होता. आशा दररोज पैशांची मागणी करत सचिनकडे लग्नासाठी हट्ट करत होताी. वारंवार लग्नाचा हट्ट केल्याने त्रासलेल्या सचिनने तिला फोन करून बोलावलं आणि तिला संपवायचे ठरवले.

घरचे बॉयफ्रेंडवरून ओरडले म्हणून प्यायली फिनाइल, रुग्णालयात गेल्यावर असं काही कळलं की…
१४ जूनच्या रात्री सचिनने आशाचा गळा आवळून खून केला. त्याच्या मृतदेह लपवण्यासाठी तो मृतदेह गाडीत ठेवून इकडे तिकडे फिरत होता. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सादळकर यांना खबऱ्याकडून खबर मिळाली की, कार (एमएच ०५ एएस ६३६८) मध्ये तरुणीचा मृतदेह घेऊन एक पोलीस कर्मचारी शहरात फिरत आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सचिनसह त्याचा साथीदार कल्पेश मधुकर खैरनार याला हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बदलापूर पाइपलाइनला असलेल्या मिर्ची ढाब्याजवळ अटक केली. आशा मोरे यांचा मृतदेह त्याच्या गाडीतून सापडला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे करत आहेत.

लेकीवर अक्षता पडत असतानाच वडिलांवर काळाचा घाला, मंडपाच्या बाहेरच घडलं भीषण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here