नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा गावात नदी पात्रात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तीनही चिमुकले देवानंद नदी ओलांडून पलीकडे असणाऱ्या हेंगलाचा पाडा इथे दुकानावर खाऊ आणण्यासाठी जात होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
एकाच गावातील या तीन चिमुकल्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत निलेश दिलवर पाडवी ०४ वर्षे, मेहर दिलवर पाडवी वय पाच वर्षे आणि पार्वती अशोक पाडवी वय ०५ वर्षे या तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.