जळगाव : रावेर तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय तरुणीला नाश्त्यात गुंगीचे औषध देऊन २ लाख रुपयाला लग्न करण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकंच नाहीतर पीडित तरुणीचे जबरदस्तीने लग्न करून तिला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचाही प्रकार घडला आहे. याप्रकरणी बुधवारी रावेर पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन अनोळखी महिलांनी २५ वर्षीय तरुणीला नाश्त्यामधून गुंगीचे औषध घालून बेशुद्ध केले. त्यानंतर लग्न करण्याच्या उद्देशाने दोन लाख रुपयाला विक्री करून पळवून नेले. यानंतर पीडितेच्या मनाविरुद्ध राकेश भगीरथ वर्मा याने पीडितेनेसोबत लग्न करून जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडितेची सासू शामू भगीरथ वर्मा, सासरे भगीरथ वर्मा, दीर कमल भगीरथ वर्मा, दिनेश भगिरथ वर्मा व विवाहित ननंद तेजू यांनी पीडितेला संगनमताने डांबून ठेवून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

खाऊ आणण्यासाठी जाताना वाटेत मृत्यूने गाठलं, तीन चिमुकल्यांनी एकत्रच गमावले प्राण
या घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून, रावेर पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

Mumbai Alert: मुंबईकरांना अलर्ट! जूनमधील सर्वात मोठी भरती, नागरिकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्ड तैनात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here