बॉलिवूडप्रमाणेच आता मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील फिटनेस, स्टाइल स्टेटमेंट, फॅशनेबल लुक, डाएट इत्यादी गोष्टींचा गांभीर्यानं विचार करू लागले आहेत. मराठी कलाकारांचेही ग्लॅमरस लुकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. इतकेच नव्हे तर त्यांचे पूर्वीचे आणि आताचे फोटो देखील प्रचंड व्हायरल होताना दिसतात. या व्हायरल फोटोंमधील त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेमंडळी थक्क होतात. लहानपणीचे फोटो पाहूण सेलिब्रिटींना ओळखता येत नाही, असं त्यांचे चाहते म्हणतात.
असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा त्या अभिनेत्रीचा अगदी लहानपणीचा फोटो आहे. पाहून मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीला ओळखणंही कठिण असल्याचं अनेकांनी म्हटलंय. हा फोटो आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळं अपूर्वा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेत अपूर्वानं साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली. ती मालिका संपल्यानंतर लगेचच अपूर्वाला ‘तुझं माझं जमतंय’ ही दुसरी मालिका मिळाली होती. या मालिकेतली तिची पम्मी ही भूमिकाही प्रेक्षकांना आवडली, पण काही कारणामुळं तिनं ही मालिका देखील सोडली. त्यानंतर ती ऐतिहासीक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.