मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशनिस्टा मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी चर्चेत असत. तिच्या फॅशन सेन्सच्या अनेकदा चर्चा होतात, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलले जाते. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Malaika Arora Viral Video) होत असतात. ती स्वत: देखील सोशल मीडियावर सक्रिय असते. आता मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तिला ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले आहे.

इन्स्टाग्रामवर मलायाकाच्या विविध फॅन्सनी मलायकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिमबाहेर स्पॉट झाली आहे. यावेळी तिने जिमवेअर कॅरी केलं आहे. दरम्यान ती जिममधून बाहेर पडल्यानंतर तिच्यासह फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी मलायकाने ज्याप्रकारे प्रतिसाद दिला, त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.

असं नेमकं काय घडलं?
मलायका अरोरा जिमबाहेर अभिनेत्री कुब्रा सैत हिच्यासह गप्पा मारत होती. त्यावेळी एक चाहता तिच्याजवळ येऊन सेल्फी काढू लागला. यावेळी मलायका काहीशी चिडून त्याला म्हणाली की, अरे भाई किती फोटो काढशील? पण यानंतर तिने म्हटलं की चल ठीक आहे, काढ फोटो. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचा-‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘सन्नी दादा’ मुख्य भूमिकेत, नव्या मालिकेत साऊथचा तडका!

Malaika Arora

अभिनेत्रीच्या वागण्यावर चाहते नाराज
दरम्यान जरी अभिनेत्रीने त्या चाहत्यासह फोटो काढला असला तरीही नेटकऱ्यांना तिचं वागणं आवडलं नाही आहे. एकाने कमेंट केली आहे की हे वागणं उद्धटपणाचं आहे. एका युजरने म्हटलं आहे की यांचा भाव जरा जास्तच वाढला आहे. दरम्यान काहींनी सेल्फी काढणाऱ्याच ट्रोल केलं आहे. फोटो काढणारा देखील निर्लज्ज आहे अशा आशयाच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हे वाचा-फोटो काढायला आलेल्या चाहत्यासह सलमान खानची अशी वागणूक, VIDEO पाहून भडकले युजर्स

काही दिवसांपूर्वी सलमान खान झाला होता ट्रोल
अलीकडेच काही दिवसांपूर्वी हा प्रकार सलमानसह घडला होता. सलमान खान याला देखील चाहत्यांनी ट्रोल केले होते. एका पॅपाराझी पेजवरुन सलमान खानचा एअरपोर्टवरील व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये सलमान खान फोटोग्राफर्सना पोज देत होता. त्यावेळी एक चाहता त्याच्यासाठी खास गिफ्ट घेऊन येतो. त्यावेळी सलमानच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीसे त्रस्त असल्याचे जाणवत आहे. हा चाहता सलमानसह फोटो देखील काढतो, पण त्यावेळी सलमानच्या चेहऱ्यावरील हावभाव फारच त्रासलेले दिसत आहेत. लोकांना सलमानचे हे वागणे फारसे रुचलेले नव्हते. अनेकांनी कमेंट करुन त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here