मुंबई: अनेक मराठी मालिकांमध्ये सध्या सनई-चौघडे वाजू लागले आहेत. संघर्षानंतर आलेल्या सुखद लग्नसोहळ्यांमुळं मालिकांमध्ये आनंदीआनंद पाहायला मिळतो आहे. कलाकारांवर भरभरून प्रेम करणारे प्रेक्षक जणू स्वत: वऱ्हाडी असल्याप्रमाणे लाडक्या नायक-नायिकेच्या विवाह समारंभात रमताना दिसत आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतही नुकताच यश आणि नेहाची विवाहसोहळा पार पडला.
अपूर्वा नेमळेकरचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…


वडील नसणाऱ्या आपल्या मुलीचा, परीचा सांभाळ करणाऱ्या आईची, नेहाची भूमिका प्रार्थना बेहेरे करते आहे, तर अभिनेता श्रेयस तळपदे एक गर्भश्रीमंत आणि तितकाच समंजस, सोज्ज्वळ यशवर्धन चौधरीच्या भूमिकेत आहे. एकाच ऑफिसमध्ये काम करत यशवर्धन नेहाच्या प्रेमात पडतो. परी यशला वडील म्हणून स्वीकारते आणि अनेक प्रयत्नांनंतर नेहा लग्नासाठी होकार देते. अखेर सगळ्यांच्या साक्षीनं अगदी राजेशाही थाटात हा लग्न सोहळा पार पडला.

लग्नानंतर यश आणि नेहाच्या नवीन संसाराला सुरुवात झाली आहे. या दोघांच्या नात्यातील गोड क्षण आता दाखवण्यात येत आहेत. यश आणि नेहा यांचा एक रोमॅन्टिक सीन सध्या व्हायरल होतोय. या प्रोमोचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यात यश आणि नेहा रोमॅन्स करताना दिसतायत. हा रोमॅन्टिक सीन सुरू असतानाच बॅकग्राऊंडमध्ये ‘तू इश्क इश्क सा मेरे’ हे रोमॅन्टिक गाणं वाजतंय. नेमकी हिच गोष्ट प्रेक्षकांना खटकली आहे.


मराठी मालिकांमध्ये हिंदी गाण्यांचा वापर वाढला, असल्याचीही खंत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. लग्न किंवा एखाद्या सणाला सीनच्या गरजेनुसार गाणी वापरली जातात. परंतु आजकाल मराठी मालिकांमध्येही हिंदी गाणी वापरली जातात. यावर प्रेक्षक नाराज आहेत.

कमेंट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here