दरम्यान, या योजनेविरोधात अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बिहारमधील बक्सर जिल्ह्यात रेल्वे रूळांवर उतरून उतरुन रेल रोको आंदोलन करण्यात आलं. याशिवाय, आरा येथेही मोठ्या प्रमाणात निदर्शन करण्यात आली. यावेळी तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली. मुजफ्फरमध्येही लोकांनी रस्त्यावर उतरुन चक्का जाम आंदोलन केलं. या तरुणांनी बेगुसरायमध्येही निदर्शने केली.
सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अग्निपथ योजनेवा विरोध केला आहे. छपरा येथे विद्यार्थ्यांना रेल्वेला आग लगल्याची घटना घडली आहे. ठिकठिकाणी तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी सुरक्षा तैनात केली आहे. तसंच, आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर केला आहे.
सैन्यात भरती होण्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतो. त्यामुळं सैन्यदलाच चार वर्षांची मर्यादा कशी काय ठरवू शकतात. ज्यात ट्रेनिंग आणि सुट्टीचा देखील समावेश असू शकतो. फक्त तीन वर्षांच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही देशाची सुरक्षा कशी काय करु शकतो. सरकारने ही योजना मागे घ्यावी, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांने दिली आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर आम्ही बेघर होऊ. म्हणूनच आम्ही आता रस्त्यावर उतरलो आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.