वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. तिला​​ अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२०‌ साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Actress Ketaki Chitale
अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर

हायलाइट्स:

  • केतकी चितळेला ठाणे न्यायलयाकडून जामीन मंजूर
  • २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
ठाणे: वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२०‌ साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने न्यालयीन कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी युक्तिवाद होऊन तिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तर कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तिचा मुक्काम ठाणे कारागृहातच राहणार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : actress ketki chitale granted bail from thane session court
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here