पूर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ अशोक खरे रेल्वे खलाशी (रा.सिद्धार्थ नगर पूर्णा) व मयत नारायण देवराम (वय ५६ रेल्वे गॅग मन रा.रेल्वे कॉलनी पूर्णा) हे दोघंही रेल्वे कर्मचारी एकमेकास परिचयातील असल्यामुळे दोघांमध्ये काही चर्चा आणि थट्टा मस्करी सुरू होती. मात्र, काही काळानंतर या थट्टा मस्करीचं रूपांतर भांडणात होऊन हाणामारीत झाले. याचदरम्या, आरोपीने त्याच्याजवळील चाकू काढून नारायण देवराम यांच्या पोटात चाकूने वार करून जखमी केले. ही घटना रेल्वे पी. डब्ल्यू. डी. कार्यालयाच्या आवाराच्या आत गेटजवळ घडली.
ही बातमी कळताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी नारायण यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पूर्णा रेल्वेच्या डाॅक्टरांनी त्यांना पुढच्या उपचारासाठी नांदेडला हलवले असता नांदेड येथील डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. १६ जून रोजी विनोद अशोक काळे (वय ३० रा.कांडखेड ता.पूर्णा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी सिद्धार्थ खरे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद झाला असून घटनेतील आरोपी सिद्धार्थ खरे यास पूर्णा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गावडे, पो.नि.सुभाष मारकड, सपोनि आश्रोबा घाटे, गायकवाड, पो.काॅ. मिलींद कांबळे, मंगेश जुकटे यांनी सापळा रचून चार तासातचं जेरबंद केले आहे. पुढील तपास पूर्णा पोलीस स्टेशनचे सपोनी. घाटे सर करीत आहेत.