बाजीराव महाराज बांगर हे मूळचे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावचे असून १२ वर्षांपासून ते कीर्तन सेवा करत आहेत. कुठलाही सराव नसताना गेली बारा वर्षापासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेत पावनखिंडीच्या लढाईत सतरा तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांची प्रेरणा ठरली.
क्लिक करा आणि वाचा- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथ झाला तयार; बैलजोडी जुंपून घेतली ६ किमीची ट्रायल

पुण्यातील कीर्तनकाराचा जागतिक विक्रम
१७ तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही १२ तास कीर्तन का करू शकत नाही. असा निश्चय त्यांनी केला.
नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे १४ जून रोजी सकाळी नऊ वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील तीन चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला. सलग १२ तास २० मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले.

कीर्तनात जागतिक विक्रम
क्लिक करा आणि वाचा- मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर तांदूळच तांदूळ, वाहतूकही विस्कळीत; काय घडलं? बघा…
या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी हभप बाजीराव महाराज बांगर यांना किरण महाराज बनकर, माऊली महाराज कुंजीर, नितीन महाराज सुक्रे, विशाल महाराज बांगर, विठ्ठल महाराज पोपळघट, विठ्ठल जाधव (चोपदार) व चंद्रकांत निकम (विणेकर) यांच्यासह २२ जणांची साथ लाभली. याचबरोबर टाळकरी, गायक, वादक यांनीही साथ दिली.
क्लिक करा आणि वाचा- सदाभाऊ खोत यांच्यावर राजू शेट्टींची टीका; म्हणाले, ‘ते शेतकरी नेते आहेत का माहीत नाही’